पारनेर :- सत्ता उपभोगण्यासाठी निवडून आलेलो नाही, तर सर्वसामान्य, गोरगरीब व तळागाळातील लोकांचे अश्रू पुसण्यासाठी मला जनतेने सेवक म्हणून निवडून दिले आहे. मतदारांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तालुक्यातील प्रत्येक गावातील समस्या सोडवू, असे आश्वासन आमदार नीलेश लंके यांनी दिले.
पारनेरचे नवनिर्वाचित आमदार लंके यांचा घोसपुरी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. योगेश घोडके, प्रा. अशोक झरेकर, अमोल इधाते, संतोष खोबरे, माजी सभापती अशोक झरेकर, सुनील ठोकळ, सोमनाथ झरेकर,
विलास झरेकर, बापू घोडके, युवराज पाटील, विलास खोबरे, सरपंच राजेंद्र खोबरे, अनिल हंडोरे, नूरमोहंमद शेख, राजेंद्र इधाते, अमोल कव्हाणे, सचिन खोबरे, अविनाश भोसले, भाऊसाहेब गाढवे, सुरेश ठोकळ आदी उपस्थित होते.
आमदार लंके म्हणाले, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील पाणीप्रश्न सोडवून शाश्वत पाणी देऊ. पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सहमतीने नवीन घोसपुरी एमआयडीसी आणण्यासाठी प्रयत्न करू. सुपा एमआयडीसीच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देऊ. पीकविम्याच्या अडचणी सोडवू, असे ते म्हणाले.