गांजाचा ओव्हर डोस घेतल्याने 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पुणतांबा – राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र पुणतांबा येथे राहणाऱ्या गणेश नावाच्या ३० वर्ष वयाच्या तरुणास रहात्या घरातून औषधोपचारासाठी लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये बेशुद्धावस्थेत आणले. 

त्याने गांजा जास्त प्रमाणात घेतल्याने गणेशला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ओषधउपचार सुरू असताना गणेशचा मृत्यू झाला.

प्रवरा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी वरीलप्रकरणी राहाता पोलिसांत खबर दिल्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सफो पवार हे पुढील तपास करीत आहेत. 

गांजा विक्रीवर राज्यात पूर्णपणे बंदी असताना अंमलीपदार्थात गांजा पदार्थ येतो. त्याची नशा भयंकर असते. त्यामुळे गणेश नावाचा तरुण गांजा जास्त प्रमाणात घेतल्याने मयत झाल्याचे समोर आल्याने परिसरात गांजा विक्री होत असल्याचे उघड झाले. या घटनेने नशा करणार्यांवमध्ये घबराट पसरली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24