पावसाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ तारखेला सुरु होणार आहे. मात्र हे अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवायच होण्याची शक्यता आहे.

विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते कार्यालयातील सामानाची आवराआवर सुरू केली आहे.

आता विखे यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकांनाही विधिमंडळातील विरोधी पक्षनेते कार्यालयाच्या कामाच्या जबाबदारीतून रिक्त होण्याच्या दिल्या सूचना दिल्या आहेत. 

पुत्र सुजय विखे यांना लोकसभेचे तिकीट न दिल्यानंतर झालेल्या वादानंतर काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

लोकसभा निवडणुकीपासून विखे आणि कॉंग्रेस पक्षामध्ये काहीशी फुट पडली आहे.त्याच पार्श्वभूमीवर सुजय विखे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश करत लोकसभा निवडणूक लढवत विजय मिळविला होता.

दरम्यान विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे बोलले जाते.



अहमदनगर लाईव्ह 24