अवघ्या ६ वर्षाच्या मुलीवर १५ वर्षीय मुलाचा बलात्कार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राहुरी –  मक्याच्या शेतात उंबराच्या झाडाखाली नेवून एका ६ वर्ष वयाच्या लहान मुलीवर १५ वर्ष वयाच्या लिंगपिसाट अल्पवयीन आरोपीने बलात्कार केला. 

ही घटना राहुरी तालुक्यातील वरवंडी परिसरात कदम यांच्या  शेतात घडली. हा खळबळजनक प्रकार ३ नोव्हेंबर रोजी भरदिवसा २ च्या सुमारास घडला.

आरोपी किरण (नाव बदललेले) हा १५ वर्षाचा असून त्याने परिसरातच राहणाऱ्या लहान मूलीला कापूस वेचण्यासाठी चल, अशी फूस लावून कदम यांच्या शेतात नेले व तेथे निरागस ६ वर्षांच्या लहान मुलीवर बलात्कार केला. 

कोणाला काही सांगितले तर तुझ्या मम्मीला मारील, अशी आरोपीने धमकी दिली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने राहुरी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन लिंगपिसाट अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 घटनास्थळी डिवायएसपी मदने, पोनि देशमुख यांनी भेट दिली. सपोनि राक्षे हे पढील तपास करीत आहेत. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलांपासूनही मुली सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24