राहुरीत ढगफुटीसदृश पाऊस,ओढ्या-नाल्यांना पूर; पाच गावांचा संपर्क तुटला !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राहुरी :- तालुक्­याच्या पश्चिमेकडील दुर्गम, डोंगराळ म्हैसगाव, शेरी, चिकलठाण आदी परिसरात काल सकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाला. तब्बल साडेचार तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ओढ्या-नाल्यांना मोठ्याप्रमाणात पूर आला होता. 

मुळा धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदीपात्रातील विसर्ग वाढविण्यात आला. ह्या पावसाने परिसरातील बंधारे तुडुंब भरलेले होते ते बंधारे फुटले. उभ्या पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्या. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते.

म्हैसगाव येथील केदारेश्वर मंदिराजवळील म्हैस ओढ्याने रौद्ररूप धारण केले होते. ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे म्हैसगाव ते राहुरी रस्ता बंद झाल्याने पाच गावांचा राहुरी तालुक्­याशी संपर्क तुटला. 

पावसामुळे पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेले तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह प्रशासकीय यंत्रणा शेरी, चिखलठाण भागात अडकली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24