अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नाशिकमध्ये गेले होते.
मात्र दुसरीकडे रोहित पवारांची त्यांच्या मतदारसंघात विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावरुन रोहित पवारांना टीकेला सामोरे जावे लागत आहे.
विजयी मिरवणुकीवरुन टीका झाल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
ते म्हणाले, सर्वांनी मिळून मोठय़ा आनंदात मिरवणूक काढली. त्यांच्या आनंदात मी सहभागी झालो. पण यामध्ये कुठेही शेतकऱ्यांच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता.
मी बांधिलकी जपतो ती या मातीशी अन् लोकांशी. आपल्या आनंदामुळे एकाही व्यक्तीचा अपमान व्हावा, त्यांना वाईट वाटावं असा माझा कधीच हेतू नव्हता व भविष्यात देखील नसेल.