कडकनाथ कोंबडी प्रकरणी १० जणांविरोधात गुन्हा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
सांगली :- कडकनाथ कोंबडी पालनातून बर्ड अग्रो प्रायव्हेट कंपनीने सांगली जिल्ह्यातील १४० गुंतवणूकदारांना १ कोटी ५४ लाख ६६ हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
या प्रकरणी कंपनीच्या अध्यक्षांसह १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इसाक पठाण यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी ‘बर्ड’चे अध्यक्ष निंबाळकर, गणेश निंबाळकर यांच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
फलटण येथील कंपनीतर्फे फेब्रुवारी २०१९ मध्ये कडकनाथ कोंबडी पालनाबाबत माहिती देण्यात आली होती. गणेश निंबाळकर आणि राहुल ठोंबरे यांनी फलटन येथे बोलावून घेत मार्गदर्शन केले होते.
सांगलीतील १०० फुटी रस्ता परिसरात कंपनीचे कार्यालय सुरू करण्यात आले होते. जिल्ह्यातील १४० जणांनी पैसे गुंतवले होते.
अहमदनगर लाईव्ह 24