टाइगर अभी ज़िंदा है !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई :- विधानसभा निवडणूक निकाल अखेर आज जाहीर झाला असून काँग्रेस-राष्ट्रवादीनं जोरदार पुनरागमन केलं आहे.

भाजपला ‘महाजनादेश’ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात सभा घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर शरद पवार भारी पडल्याचं स्पष्ट झालं आहे.

सोशल मीडियातही याचं प्रतिबिंब उमटू लागलं असून शरद पवारांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.पवारांच्या या पॉवरचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे.

ट्विटरकरांनी पवारांचं महाराष्ट्रातील टायगर अशा शब्दांत कौतुक केलं आहे. ‘करना था २२० पार… लेकीन बीच मे आये शरद पवार…’ असे एकामागोमाग एक ट्विट लोक करत आहेत.

आमदार, खासदार सोडून गेल्यानंतरही न डगमगता शरद पवार प्रचारात उतरले. वयाचा विचार न करता महाराष्ट्रात सभा घेतल्या. मोदी व शहा यांच्या राष्ट्रीय पातळीवरील मुद्द्यांना पवारांनी महाराष्ट्रातील विकासाचे मुद्दे पुढं करून जोरदार प्रत्युत्तर दिले. त्याचा योग्य तो परिणाम दिसला.

मोदी व शहा यांनी ज्या ठिकाणी सभा घेतल्या, तेथील भाजपच्या उमेदवारांनाही पराभव पत्करावा लागला. साताऱ्यात भर पावसात सभा घेऊन पवारांनी आपल्या लढवय्या वृत्तीचा परिचय दिला. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकांनी राष्ट्रवादीला भरभरून मतदान केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24