श्रीगोंदे – बनावट नोटाप्रकरणी श्रीगोंदे पोलिसांच्या पथकाने घोगरगाव परिसरातून अतुल रघुनाथ आगरकरला याला ताब्यात घेतले आले. तो बनावट नोटा देऊन सोने खरेदी करणार होता. यांच्याकडे दोन लाख ८३ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.
त्याचा मास्टरमाईंड श्रीकांत सदाशिव माने याला बारामतीमध्ये ताब्यात घेतले होते. तसेच पोलिसांनी खाक्या दाखवताच यातील अन्य दोन आरोपी यात युवराज कांबळे (रा. बारामती) व सुमित शिंदे खडकी (ता. दौंड) यांना रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतले.
याच ठिकाणी नोटा छापण्याचा कलर प्रिंटर आणि साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले असून यात आतापर्यंत एकूण चार आरोपी ताब्यात घेतले.
श्रीगोंदे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित यांच्या पथकान २ लाख ८३ हजार रुपयांसह काळ्या रंगाच्या गाडीसह आलेला अतुल रघुनाथ आगरकर (रा.जवळेवाडी) बारामती याला पकडले. यानंतर श्रीकांत सदाशिव माने याला ताब्यात घेतले. या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १२ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
यानंतर सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित त्यांच्या पथकातील विकास वैराळ, अमोल कोतकर यांनी बारामतीमधून युवराज लक्ष्मण कांबळे याला ताब्यात घेतले, तर खडकीमधून सुमित भीमराव शिंदे याला ताब्यात घेतले. खडकीमध्येच एका घरात नोटा छापण्यात येत होते.
या ठिकाणी संगणक, नोटा छापण्यासाठीचे कलर प्रिंटर, कटर असा मुद्देमाल सापडला. मात्र, यापूर्वीच त्यांनी कागद आणि शाई लंपास केला. माने आणि कांबळे हे खडकीमध्ये येऊन शिंदे यांच्या घरी नोटा छापत होते.
या बनावट नोटा प्रकरणात एका महिलेचा घनिष्ट संबंध आहे. या महिला पुण्यात बनावट नोटा विकण्यासाठी मध्यस्थी करीत, अशी माहिती पोलिसांना समजली. नोटांच्या कारखान्याच्या सुगावा बनावट नोटा तयार करण्याचा छापखाना पुणे जिल्ह्यात थाटला होता.
या कारखान्यातून परराज्यात बनावट नोटा मागणीनुसार पाठवल्या जात होत्या. पोलिसांना बनावट नोटांचा कारखाना कुठे आहे? याचा सुगावा लागला. लवकरच याचे बिंग फुटणार आहे, अशी माहिती तपासी अधिकारी साहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित यांनी दिली. या बनावट नोटांचा विधानसभा निवडणुकीत वापर केला असण्याची शक्यता आहे.