माजलगाव :- पत्नी, मुलाचा चाकूने भोसकून खून करून आरोपीने नंतर स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील मोगरा गावाजवळील रामनगर तांड्यावर बुधवारी दुपारी घडली.
खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. बंडू उत्तम जाधव (४०) असे आरोपीचे नाव आहे.
रामनगर तांड्यावर तो वास्तव्यास आहे. बुधवारी पत्नी गंगा, मुलगा करण व मुलीसह तो शेतात कापूस वेचत होता. दुपारी ४ वाजता शेतात कापूस वेचणी सुरू असताना बंडू याने पत्नी गंगा (३५) हिचा आधी गळा आवळून खून केला. दरम्यान, पत्नीचा खून केला तेव्हा मुलगा करण (८) व मुलगी पूजा झाडाखाली खेळत होते.
बंडू या मुलांकडे आला. करण याने मुलास सोबत घेतले आणि पूजाला झाडाखालीच थांबण्यास सांगितले. पत्नीचा खून केला तिथे करणला आणून त्याचा आधी गळा दाबला व नंतर पोटात चाकूने भोसकून खून केला. यानंतर त्याने पोटात चाकूने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला.