अहमदनगर ;- शहर छपाट्याने वाढत असताना उपनगरात अद्यावत आरोग्य सुविधांची गरज आहे. सर्व तज्ञ डॉक्टरांनी रुग्णसेवेसाठी पुढाकार घेऊन सुरु केलेले लोटस हॉस्पिटलचा लाभ सर्वसामान्यांना होणार असल्याची भावना खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.
केडगाव येथील नव्याने सुरू करण्यात आलेल्या लोटस हॉस्पिटल व आय.सी.यु. सेंटरचे शुभारंभाप्रसंगी डॉ.विखे बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपट पवार, दिलीप सातपुते, नगरसेवक अमोल येवले, विजय पठारे, मनोज कोतकर, लताताई शेळके, सुनिल मामा कोतकर, प्रभाकर गुंड आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
केडगाव उपनगरातील व पंचक्रोशीताल ग्रामस्थांना तातडीच्या आरोग्य सुविधा मिळण्याकरीता सर्व डॉक्टरांनी पुढाकार घेऊन या लोटस हॉस्पिटलची मुहुर्तमेढ रोवली आहे.
25 बेडची क्षमता असलेले हे अद्यावत हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचा मानस संचालक डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. तसेच या ठिकाणी शासकीय आरोग्य सुविधांचा लाभ देखील गरजू रुग्णांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
या अद्यावत हॉस्पिटलमध्ये सुसज्ज आय.सी.यू., ऑर्थो व ट्रॉमा, सर्जरी, स्त्री रोग, बालरोग, दंत व नेत्ररोग विभागांचा समावेश आहे.
हॉस्पिटलच्या संचालक मंडळात डॉ.मुकुंद शेवगावकर, डॉ.बाळासाहेब सोनवणे, डॉ.अमोल जाडकर, डॉ.विजय साठे, डॉ.संदीप जाधव, डॉ.क्षितिज चौधरी, डॉ.सचिन शिंदे, डॉ.सागर पंडित, डॉ.राजेंद्र सासवडे या तज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे.