कर्तव्य बजावत असताना वीज पडून २२ वर्षीय जवान शहीद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नळदुर्ग  तुळजापूर तालुक्यातील गुळहळ्ळी गावचे सुपुत्र भारतीय लष्कर दलात मेजर सतीश नागनाथ बाबर (२२) यांचा पुणे येथे कर्तव्य बजावताना बुधवारी सायंकाळी ४ च्या सुमारास अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. 

गुरुवारी (दि.७) सायंकाळी ६.३० वाजता त्यांच्या मूळगावी गुळहळ्ळी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबर हे पुणे येथे कर्तव्य बजावत असताना बुधवारी दुपारी अंगावर वीज कोसळल्याने शहिद झाले. 

पुणे येथून दुपारी त्यांचा मूळगावी गुळहळळी येथे पार्थिव आणण्यात आले. सायंकाळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

बाबर हे अठराव्या वर्षी सैन्यदलात रूजू झाले होते. त्यांच्या मागे आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24