मुंबई: अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचं ठरलंच नव्हतं, या भाजप नेत्यांच्या दाव्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुरती चिरफाड केली आहे.
ठाकरे घराण्यावर पहिल्यांदाच कुणीतरी खोटारडेपणाचा आरोप केला आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहांच्या वक्तव्याचा आधार घेऊन आम्हाला खोटं ठरवलं आहे. शहा आणि कंपनीने कितीही खोटेपणाचा आरोप केला तरी खोटं कोण आणि खरं कोण हे सर्वांना माहित आहे.
शहा आणि कंपनीच खोटारडी असून अशा लोकांसोबत राहायचं नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचं वस्त्रहरण केलं. मी चर्चेचे दरवाजे बंद केले नाहीत.
माझ्यावर खोटारडेपणाचा आरोप केला. मला खोटारडे ठरवण्याचा प्रयत्न काळजीवाहूंनी करू नये. मला कुणाच्या सर्टीफिकेटची गरज नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.