चारित्र्याच्या संशयातून विवाहितेची हत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

यवतमाळ :- शहरात भाड्याने राहत असलेल्या दाम्पत्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरून कडाक्याचे भांडण झाले रागाच्या भरात पतीने पत्नीला जबर मारहाण करून तीचे डोके भिंतीवर आदळल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

निकिता आकाश चव्हाण (वय 24) असे मृतक विवाहितेचा नाव आहे. तिचा पती आकाश दादाराव चव्हाण (वय 28) हा फायनान्स कंपनीत काम करीत होता. या दाम्पत्याना दोन अपत्य आहेत,

तालुक्यातील उमरी येथील रहिवाशी असणाऱ्या या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. पतीचा नेहमीच तिच्या चारित्र्यावर संशय होता, त्यातूनच हे कृत्य घडले. पतीने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24