पतीच्या निधनानंतर एकट्या पडलेल्या महिलेवर दिराने केला चाकूचा धाक दाखवत अत्याचार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अमरावती : पतीच्या निधनानंतर एकट्या पडलेल्या एका महिलेवर दिराने चाकूचा धाक दाखवून अत्याचार केला. त्यासाठी नराधम दिराला सासूनेही मदत केली. नात्याला काळीमा फासणारी ही घटना सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ नोव्हंेबर रोजी रात्री उघडकीस आली.

या प्रकरणी दिरासह सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी पीडित ४१ वर्षीय महिलेच्या पतीचे ५ एप्रिल २०१९ रोजी निधन झाले. पतीच्या निधनानंतर प्रथेप्रमाणे सदर महिला घराबाहेर निघत नव्हती. या काळात दिराची वाईट नजर त्यांच्यावर पडली.

तो नेहमीच वहिनीसोबत असभ्य वर्तन करू लागला. दिराच्या सततच्या जाचाला कंटाळलेल्या पीडितेने अखेर याबाबत आपल्या सासूला सांगितले. त्यावर मुलाला समजाविण्याऐवजी सासूने त्याकडे दुर्लक्ष केले. उलट मुलाला जे करायचे आहे ते करू दे, असा सल्ला त्यांनी सुनेला दिला. ही बाब नराधम दिराला कळल्यानंतर त्याने पीडितेला शिवीगाळ करून जाळून मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेली पीडिता गप्प राहिली.

त्यांनी या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नाही. त्यामुळे नराधम दिराची हिंमत वाढली. २६ जुलै २०१९ रोजी तो पीडित वहिनीच्या खोलीत शिरला. चाकूचा धाक दाखवून त्यांच्यावर अतिप्रसंग केला. त्यानंतर २ ऑगस्ट २०१९ रोजी पुन्हा त्याने चाकूच्या धाकावर वहिनीचे लैंगिक शोषण केले.

दिराचा हा सततचा त्रास असह्य झाल्याने पीडितेने अखेर मोठ्या हिंमतीने सरमसपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24