राहुरी – केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळू नये म्हणून कांदा निर्यातबंदी केली. याच्या निषेधार्थ काल नगर – मनमाड रस्त्यावर राहुरी बाजार समितीसमोर अन्यायाच्या निषेधार्थ कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाची प्रतिकात्मक तिरडीसह अंत्ययात्रा काढली. घोषणाबाजी केली व रस्त्यावर आंदोलन करुन वाहतुकीस अडथळा केला.
या प्रकरणी काल हे.कॉ.प्रविण मकासरे यांच्या फिर्यादीवरुन कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारे आंदोलक आरोपी रविंद्र बापूसाहेब मोरे,
रा. टाकळीमिया, ता. राहरी, प्रकाश बाबासाहेब देठे, रा. खडसरगाव, ता. राहुरी व इतर ७ जण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.नि. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ जाधव हे पुढील तपस करीत आहेत.