क्रेन शेतातून आणल्याचा जाब विचारल्याने महिलेस मारहाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

शिर्डी – कोपरगाव तालुक्यातील माळवाडी, कोकमठाण परिसरात राहणारी शेतकरी महिला अलका मारुती लोहकणे, यांच्या शेतातील सिताफळ व रामफळाचे झाड क्रेन आणल्याने धक्का लागुन वाकले. 

तेव्हा या शेताच्या रस्त्यातून क्रेन का आणला असे अलका लोहकणे या महिलेने विचारले असता ६ जणांनी लाकडी दांडा, लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करुन पायावर मारुन फॅक्चर केले.

 शिवीगाळ करुन जिवे ठार मारणयाची धमकी दिली. जखमी अलकामारुती लोहकणे या महिलेने कोपरगाव शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन मारहाण करणारे आरोपी सोपान तुळशीराम लोहकणे, रविंद्र सोपान लोहकणे, सागर सोपान लोहकणे, मयूर सुधाकर लोहकणे, वैभव दिनकर लोहकणे, पौर्णिमा दिनकर लोहकणे, सर्व रा. माळवाडी, कोकमठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोना दारकुंडे हे पुढील तपास करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24