मोर्शी : कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा मृत्यू झाला. ही दुदैवी घटना आज रविवारी दुपारी शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेहेगाव-सावरखेड मार्गावर घडली. नाजूकराव उदयभान तायडे (५५) व शालिनी नाजूकराव तायडे (४५) रा.कठोरा बु. अशी मृतक पती-पत्नीचे नाव आहे.
शालिनी यांच्या निंभी येथील रहिवासी बहीण आजारी आहेत. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी नाजूकराव व त्यांच्या पत्नी शालिनी हे दोघे आज दुपारी दुचाकी क्रमांक एमएच २७ एएस ६५३० ने लेहेगाव-सावरखेडमार्गे निंभीला जात होते.
यावेळी त्यांच्यासोबत मार्गाने जाणाऱ्या स्विफ्ट कार क्रमांक एमएच २७ बीई ००८४ चा टायर फुटला. त्यामुळे सदर स्विफ्ट कारची मार्गावरून जाणाऱ्या अल्टो कार क्रमांक एमएच ३१ सीपी ९२२० ला धडक बसली.
त्यानंतर अल्टो कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने नाजूकराव यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दोन कार व दुचाकीच्या या विचित्र अपघातामध्ये नाजूकराव व त्यांच्या पत्नी शालिनी गंभीर जखमी झाल्या.