मित्रानेच केली मित्राची हत्या, दोन तासांत आरोपींना अटक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

यवतमाळ : वणी-चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग जवळ २ नोव्हेंबरच्या दुपारी ३ वाजताच्या सुमारास मारेगाव शहरातील बेपत्ता असलेल्या योगेश गहुकार या २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. या हत्येप्रकरणी विविध चर्चेला उधान आले होते.पोलिसांनी अवघ्या दोन तासांतच आरोपींना अटक केली.

मित्रानेच मित्राची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. राजू रामकृष्ण भोंगळे रा. मारेगाव, सुशांत बाळकृष्ण पुनवटकर रा. कोलगाव अशी मारेकऱ्यांची नावे आहे. मारेगाव येथील योगेश गहुकर हा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मारेगाव येथे तासिका तत्त्वावर निदेशक म्हणून कार्यरत होता. 

दरम्यान १ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता वाहनचालक परवाना काढण्याकरिता वणी येथे जात असल्याचे कुटुंबियाना सांगून घरुण निघाला. परंतु योगेश रात्री उशिरा पर्यत घरी न पोहोचल्याने व मोबाईल बंद असल्यामुळे कुटूंबाच्या चिंतेत वाढ झाली. 

त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी मारेगाव पोलीसात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. बेपत्ता झाल्यापासून त्याच्या कुटुंबियांनी व काही लोकांना सोबत घेऊन शोधाशोध सुरू केली होती. तसेच पोलीसही योगेशचा शोध घेत होते. 

अखेर दुपारी ४ वाजताच्या दरम्यान वणी शहराजवळील चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग जवळ पोलिसांना योगेशचा मृतदेह आढळून आला. कुटुंबीयांनी पाहणी करून सदर मृतदेह हा योगेशचा असल्याची खात्री केली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24