पीक विमा योजनेत पेरू च्या समावेशासाठी प्रयत्न

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राहाता : हवामानावर आधारित पीक विमा योजनेत पेरू फळाचा समावेश होण्यासाठी कृषी आयुक्तांशी बोलून निर्णय करण्यास सांगू, अशी ग्वाही ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पेरू उत्पादक शेतकऱ्यांना दिली आहे. राहाता तालुका राज्यात पेरू पिकाचे आगार मानले जाते.

मागील काही वर्षात पावसाच्या कमी अधिक प्रमाणामुळे पेरूच्या बागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले. तालुक्यातील पेरूच्या शेतीचे अर्थकारणही मोठ्या प्रमाणात बिघडल्याने पेरू उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याची परिस्थिती निर्माण झाली.

नैसर्गिक वातावरणातील बदलांचा परिणाम पेरू उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्याने पेरू फळाचा समावेश हवामान आधारित पीक योजनेत करण्यात आला होता.

 परंतु, यावर्षी या योजनेत पेरू फळाचा समावेश नसल्याने पेरू उत्पादकांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. ही बाब पेरू उत्पादकांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.

अहमदनगर लाईव्ह 24