श्रीरामपूर – शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या सभेला माजी आमदार भानुदास मुरकटे यांनी हजेरी लावली. गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे व मुरकुटे यांनी रंगत आणली. बारा विरुद्ध शुन्याची विखे यांच्या घोषणेची ठाकरे यांनी स्वागत करत कोल्हापूरकरांप्रमाणे नगरकरांनी ठरवलंय. त्यामुळे त्यांना भगवा न्याय देईल, असे सांगितले.
शिवसेनेचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ काल ठाकरे यांच्या सभेने करण्यात आला. यावेळी सभेतील जनाबाई तुपे या वृद्ध महिलेला व्यासपीठावर बोलावून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. सभेत माजी उपनगराध्यक्ष अंजूम शेख, राजेश अलघ, रवि गुलाटी, बाळासाहेब गांगड यांच्यासह काँग्रेसच्या बावीस नगरसेवकांनी प्रवेश केला. त्यांचा ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विठ्ठल राऊत यांनी ठाकरे यांना काठी वघोंगडी देऊन सत्कार केला. सभेस खासदार सदाशिव लोखंडे, त्यांचे चिरंजीव डॉ. चेतन लोखंडे, मिलिंद नार्वेकर, माजी आमदार भानुदास मुरकुटे, चंद्रशेखर कदम, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, म्हाडाच्या नाशिक विभागाचे अध्यक्ष शिवाजी ढवळे, जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, पंचायत समितीचे सभापती दिपक पटारे आदि उपस्थित होते.
सभेत माजी आमदार मुरकुटे यांनी विखे यांच्याशी आपली कधी मैत्री तुटते तर कधी जमते. मुळा प्रवराच्या सभेत खासदार डॉ. सुजय विखे व माझे ठरले आहे. त्यामुळे मंत्री विखे आमच्या हातात आहेत. मीच कांबळेंना सेनेत जायचा सल्ला दिला. ठाकरे यांनी आमचे ऐकले. या घडामोडीमुळे आतापर्यंत एकवीस विकेट पडल्या. लोकसभेत लोखंडेना मदत केली नव्हती. ते निवडून आले.
मात्र त्याना २०१० साली आपणच निवडणुकीसाठी श्रीरामपुरात आणले होते, असे सांगितले. मंत्री विखे यांनी लोकसभेत खासदार लोखंडेंना निवडून आणून चमत्कार केला. त्यावेळी मुरकुटेनी सल्ला ऐकला नाही. ते जेव्हा माझा सल्ला ऐकतात तेव्हा त्यांचा फायदा होतो. सल्ला ऐकत नाहीत तेव्हा तोटा होतो. कांबळेंचे काही चुकले असेल तर ते सोडून द्या. आत पुनरावृत्ती होणार नाही.
श्रीरामपुरात येत्या चार पाच दिवसात चमत्कार घडवू, असे त्यांनी सांगितले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बाजीप्रभू देशपांडेसारखी खिंड लढवत असल्याच सागितल पण बाजीप्रभूची सर त्यांना कशी येईल. थोरात हे सत्तेसाठी खिंड लढवित आहेत. महाराष्ट्र उभा करण्याचे सामर्थ्य हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ठाकरे यांच्यात आहे.
थोरातांना खिंड सांभाळता येणार नाही. तेच निवडणुकीत पडतील, असेही विखे म्हणाले. डॉ. चेतन लोखंडे यांनी नगर जिल्हा विभाजन करुन श्रीरामपूर मुख्यालय करण्याची मागणी केली. खासदार सदाशिव लोखंडे, अंजूम शेख, माजी आमदार चंद्रशेखर कदम, सभापती पटारे, सुनिता गायकवाड , प्रकाश चित्ते.
शिवाजी ढवळे, भाऊसाहेब बांद्रे, अशोक थोरे, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, शरद नवले, उपसभापती बाळासाहेब तोरणे, सदा कराड आदिंची यावेळी भाषणे झाली.