…तरच राहुरीत धक्कादायक निकाल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राहुरी विधानसभा मतदार संघात आ .शिवाजी कर्डिले यांनी मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत माजी खा. बापूसाहेब तनपुरे, नगराध्यक्षा सौ. उषाताई तनपुरे यांना पराभूत केले आहे. आता नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरेंना पराभूत करून ते राहुरीत आहे.

मतदार संघाबरोबरच तनपुरे घराण्यावर विजयाची हॅट्रिक करण्याच्या कर्डिले तयारीत आहे .दरम्यान, तनपुरे , विखे यांनीही आ .कर्डिलेंची हॅट्रिक रोखण्यासाठी जोरदार व्यूहरचना केली असली तरी, त्यांची सर्व मदार ही ‘प्रवरे’ च्या मदतीकडे आहे. तसे काही झाले तरच राहुरीत धक्कादायक निकाल लागू शकतो.

राहुरीत आ. कर्डिले विरोधात नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे ही निवडणूक रंगतदार होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, आ. कर्डिले हे सत्तेत असल्याने त्यांना सरकारची ताकद मिळत आहे.

याशिवाय ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचे त्यांना सहकार्य असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास झळकताना पहायला मिळतोय. त्यांनी पाच वर्षे पायाला भिंगरी बांधून मतदार संघ पिंजून काढला आहे. १२०० कोटींची विकासकामे केल्याचेही ते छाती बडवून सांगत आहेत.

याच कामांच्या जोरावर ते आता प्रचारात पळताना दिसत आहे. त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता तनपुरेंचे एकास एक हे गणितही चुकते की काय? अशीच साशंकता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्राजक्त तनपुरे यांनीही पाच वर्षे चांगली मेहनत घेतली आहे.

मात्र, नगरपालिकेची नाराजी आणि कारखान्याच्या पेमेंटची भ्रमनिराशा याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीवर मात करून तनपुरे हे आ. कर्डिलेंना लक्ष्य करून सरकारच्या चुकीच्या धोरणांबाबत जनतेच्या मनात जागृकता निर्माण करत आहेत. याचा त्यांना निवडणुकीत फायदा होणार आहे. मात्र तो कितपत होईल याबाबत प्रश्न आहे. दरम्यान, प्रवरा पट्यातील गावात तनपरेंनी मताधिक्य घेतले तरच त्याचा फायदा होवून तनपुरे विजयी होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24