नगर – श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील एक १६ वर्षाची तरुणी कॉलेजला जाताना नेहमी तिचा पाठलाग करुन माझे तुझ्यावर प्रेम आहे.
तू माझ्याबरोबर लग्न कर, फोटो काढ, अशी वेळोवेळी छेड काढून विद्यार्थिनी घरी एकटी असताना तिला धरुन माझे तुझ्यावर प्रेम आहे.
तू माझ्यासोबत पळून चल नाहीतर मी तुझ्यादारात वीष पिवून मरुन जाईल, अशी धमकी देवून विनयभंग केला.
याप्रकरणी अल्पवयीन विद्यार्थिनीने श्रीगोंदा पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी अरिफ बारकू शेख, रा. लिंपणगाव, ता. श्रीगोंदा याच्याविरुद्ध भादवि कलम ३५४, ३५४ ( अ ), ३५४ ( ड ) ५०६ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम ७, ८ प्रमाणे पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि गावीत हे पुढील तपास करीत आहेत.