आ. कांबळेंच्या निष्क्रियतेमुळेच श्रीरामपूर दुष्काळी अनुदानापासून वंचित – करण ससाणे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर – आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या निष्क्रियतेमुळेच श्रीरामपूर तालुका दुष्काळ निधीपासून वंचित राहिला, अशी टीका उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केली आहे. शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या आमदाराला जनता कदापी माफ करणार नाही, असेही ससाणे म्हणाले.

काँग्रेस उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकांमध्ये ससाणे बोलत होते . मतदारसंघातील बोधेगाव, कान्हेगाव, लाडगाव, दिघी, नायगाव, रामपूर, गोधर्वन आणि सराला आदी ठिकाणी बैठका पार पडल्या.

यावेळी उमेदवार लहू कानडे, मुळा प्रवराचे उपाध्यक्ष जी. के. बकाल, माजी सभापती सचिन गुजर, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण नाईक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, ज्ञानेश्वर मुरकुटे, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव हेमंत ओगले, सतिश बोडें, राजू औताडे आदी उपस्थित होते.

ससाणे म्हणाले , तालुक्यात दुष्काळाची भयाण परिस्थिती असताना व शेतकरी वर्ग अडचणीत असताना त्याला कठलेही सरकारी सहाय्यक मिळू शकले नाही. लोक प्रतिनिधी म्हणून संधी मिळूनही तालका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट होऊ शकला नाही पीक विम्याचाही तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही.

त्यामुळे त्यांना पुन्हा मते मागण्याचा नैतिक अधिकार उरला नाही. विशेष म्हणजे बेलापूर मंडल दुष्काळग्रस्त जाहीर होऊनही अद्यापर्यंत अनुदान मिळालेले नाही. जी. के . पाटील म्हणाले. काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे हे उच्चशिक्षीत असून त्यांना प्रशासकीय अनुभव आहे. त्यामुळे ते विविध योजना मतदारसंघात आणू शकतात.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे यांनीही कानडेयांचा प्रशासकीय अनुभव दांडगा असल्याने त्यांना मतदारसंघाच्या विकासासाठी फायदा होईल, असे सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24