जामखेड – मंत्री असुन शेतकऱ्यांना हक्काचे पाणी देऊ शकले नाहीत.कुकडीमधून कर्जतसाठी नमुद केले गेलेले पाणी आपल्याला आणायचे आहे.तुम्हाला जेवढी भूक लागली आहे तेवढीच विकासाची भूक मलाही लागलेली आहे.जनता अडचणीत असताना त्यांना ते आठवत नाहीत निवडणुक आली की लगेच आठवण होते.
आता गावागावातील उत्तुंग प्रतिसाद पाहता माझी जबाबदारी वाढली आहे.असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी थेरवडी येथे बोलताना केले. तालुक्यातील जळकेवाडी,लोणी मसदपुर, खातगाव, आंबीजळगाव, कुंभेफळ, कोळवडी, कुळधरण, तोरकडवाडी,थेरवडी आदी भागात गावभेट शेतकरी, ग्रामस्थांच्या भेटी घेऊन संवाद साधला.
यावेळी ग्रामस्थांनी पाणी प्रश्नावर राम शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त केली.पुढे पवार म्हणाले की, ‘पुढच्या काळात या मतदारसंघातले प्रश्न आपण मार्गी लावणार आहोत. ही निवडणुक लोकांनीच हातात घेतली असुन आता विरोधकांनी काहीही प्रलोभने दिली तरी बळी पडू नका असेही भावनिक आवाहन पवार यांनी केले.
शेतीसाठी पाण्याचा प्रश्न मिटला तर हा भाग सम्रूद्ध होणार आहे मात्र हक्काच्या पाण्यापासुन मंत्र्यांनी आम्हाला दूर ठेवले हा पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली.