सातारा : काँग्रेस – राष्ट्रवादीसह अन्य पक्षातूनही अनेक दिग्गज नेते भाजपा, शिवसेना या सत्ताधारी पक्षात जाण्यासाठी अक्षरश: रांगेत आहेत.
असे असताना रामराजे व राजेगटाने बोलाविलेल्या मेळाव्यात ते पक्षांतर करणार अशी जोरदार चर्चा राज्यभर सुरु होती.
तर चॅनल, वृत्तपत्रातूनही अंदाज आडाखे बांधले जात असताना रामराजे यांनी हा मेळावा कार्यकर्त्यांशी सुसंवाद आणि त्यांच्या अपेक्षा अडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित केल्याचे सांगत कोणताही निर्णय न घेता मेळाव्याची सांगता केली.
दरम्यान, शरद पवार हाच आपला पक्ष असून प्रसंगी जनहितासाठी पक्षांतराचा निर्णय घ्यावा लागला तरी कोणालाही न दुखवता योग्य निर्णय घेऊ, असेही रामराजेंनी यावेळी स्पष्ट केले.
श्रीमंत रामराजे व राजेगटाने शुक्रवारी येथील अनंत मंगल कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या महामेळाव्याचे आयोजन केले होते.