नगर – पंधरा वर्षांच्या पोटच्या मुलीशी बापानेच अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. काटवन खंडोबा परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली.
पीडित मुलगी व तिचा बाप दोघेच घरी असताना तो अश्लिल चाळे करत असे. हा जाच वाढत चालल्याने मुलीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली.