कोपरगाव – कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विकासाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मागील पाच वर्षापासून आशुतोष काळे यांनी केलेला झुंजार संघर्ष आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघाला पुन्हा विकासाच्या वाटेवर घेवून येण्यासाठी आशुतोष काळे यांच्या सारख्या उच्चशिक्षित नेतृत्वाची गरज आहे.
त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही जीवाचे रान करून कोणत्याही परिस्थितीत आशुतोष काळेंना विधानसभेत पाठवू, असा निर्धार वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी कोपरगाव येथे केला.
कोपरगाव तालुका व शहरातील वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख पदाधिकारी व असंख्य कार्यकत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांना आपला प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
त्यावेळी वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी भारिप तालुकाध्यक्ष विजयराव त्रिभुवन, वंचित आघाडी तालुकाध्यक्ष राहुल खंडिझोड, भारिप शहराध्यक्ष नितीन शिंदे,
भारिप जिल्हा सल्लागार मनोज शिंदे, वंचित आघाडी जिल्हा उपाध्यक्ष संजय दुशिंग, भारिप नेते राजेंद्र उशिरे, वंचित आघाडी तालुका उपाध्यक्ष सचिन हुसळे, वंचित आघाडी शहराध्यक्ष अविनाश शिंदे, रविंद्र जगताप, रविंद्र भालेराव, आनंद कोपरे, अशोक जमधडे, बाळू शिंदे, विशाल कोपरे, गणेश पवार, विशाल आव्हाड, अजय उशिरे, दिनेश जमधडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.