म्हणून त्या आमदारांना मते मागण्याचा अधिकार नाही!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

शेवगाव –
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ केले. भाजप सरकारने मात्र शिवाजी महाराजांचे नाव घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली, असी टीका जि. प. उपाध्यक्ष राजश्री घुले यांनी केली. महाआघाडीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. 

जि. प. सदस्य प्रभावती ढाकणे, संगीता दुसुंगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष स्नेहल फुंदे, माजी नगराध्यक्ष रत्नमाला उदमले, उषा मोटकर, छाया धोंडे, आशा भोसले, उज्ज्वला शिरसाठ, आरती निऱ्हाळी आदी या वेळी उपस्थित होत्या.

ढाकणे म्हणाल्या, भाजपने महिलांसाठी कोणते ठोस काम केले नाही. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, आशा सेविकांचे कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत. पाण्याचा प्रश्न आमदार सोडवू शकल्या नाहीत. 

आपल्या मर्जीतले पदाधिकारी व नातेवाईकांना घेऊन त्यांनी मनमानी कारभार केला. आता त्यांना मते मागण्याचा अधिकार नाही. कितीही भावनिक वातावरण तयार केले, तरी जनता यावेळेस त्यांना मतदान करणार नाही.

अहमदनगर लाईव्ह 24