पुणे – संगमवाडी येथील एका तरुणाचा सिमेंट ब्लॉक आणि फरशीने ठेचून खून करण्यात आला. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जाणाऱ्या तिघा जणांना लोणी काळभोर पोलिसांनी पाठलाग करून पकडले.
हा प्रकार पुण्यातील वाघोलीकडून थेऊरकडे जाणाऱ्या रोडवर पहाटे पावणेचारला घडला. अशोक संतोष आडवाणी (२२, रा. पिंपरी), अक्षय दिलीप पवार (१९, रा. वरवंड, दौंड) आणि विजय संतोष पवार (१९, रा. वरवंड, दौंड) अशी त्यांची नावे आहेत, तर भारत राजू बढे (२४, रा. कासारवाडी) असे मृताचे नाव आहे.
वाहतूक पोलिस नाईक संदीप देवकर थेऊर येथे रात्री गस्त घालत होते. पहाटे पावणेचारच्या सुमारास त्यांनी चार संशयित दुचाकीस्वारांना पकडले.
चौकशी केल्यावर त्यांनी भारत बढे यांचा येरवडा येथे सिमेट ब्लॉकने ठेचून खून केल्याचे सांगितले.