सोशल मिडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर – मोबाईलमध्ये काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत केडगावच्या महिलेवर सावेडीत अत्याचार करण्यात आला. 

मौजूदीन ऊर्फ मोसीन सय्यद (रा. शिलाविहार, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पिडित महिला ही केडगाव येथील आहे. सावेडीत तिची गायकवाड नावाची मैत्रिण राहते. पिडित महिला ही २९ ऑगस्टला सावेडीत मैत्रिणीकडे जात होती. मौजुदीन ऊर्फ मोसीन सय्यद याने तिला रस्त्यात अडविले. 

मोबाईलमधील असलेले  फोटो दाखवून ते फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. एका फ्लॅटवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला.

२९ ऑगस्टच्या रात्री घडलेल्या या घटनेची नोंद तोफखाना पोलिसांत आज शुक्रवारी करण्यात आली. इच्छेविरुध्द अत्याचार केल्याचा गुन्हा तोफखाना पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24