नगरमध्ये ५४ लाखांचे सोने-चांदी व भेटवस्तू जप्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर –
विधानसभा निवडणुकीसाठी नेमलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाने रविवारी सोने, चांदी व महागड्या भेटवस्तू असा सुमारे ५४ लाखांचा मुद्देमाल पकडला.

वसंत टेकडी भागात वाहनांची तपासणी करत असताना त्यांना संशयास्पद वाहनात (एमएच ०२ डीजे ७१७७) दोन बॉक्स आढळले. एका बॉक्समध्ये ५१ लाख ७२ हजार ८३९ रुपये किमतीचे सुमारे दीड किलो सोने आणि दुसऱ्या बॉक्समधे ३ लाख १५ हजार ८६४ रुपये किमतीची सुमारे ७ किलो चांदी, तसेच १० भेटवस्तू आढळल्या.

समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पथकाने हा मुद्देमाल जप्त करत जिल्हा कोषागार कार्यालयात जमा केला. आयकर विभागाचे उपायुक्त नायर यांनी या मुद्देमालाची तपासणी केली. वस्तू व सेवाकर विभागाला याची माहिती देण्यात आली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24