पालकमंत्री राम शिंदे – रोहित पवार समर्थकांमध्ये ‘तुफान’ राडा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

जामखेड – पालकमंत्री राम शिंदे व रोहित पवार यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमकीतून हाणामारी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या चाकू हल्ल्यात दोन जखमी झाले आहेत. 

यामुळे चिडलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर दगडफेक करून वाहनाची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात हाणामारीच्या घटनेने गालबोट लागले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील बांधखडक येथे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भाजपचे कार्यकर्ते भालेराव हिरालाल वनवे (वय २८), हर्षवर्धन शंकर कुंदे (वय २२, रा. दोघे बांधखडक) हे मतदान करण्यासाठी जात होते.

यावेळी विरोधी गटातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी भालेराव, वनवे यांच्या नाकावर व हातावर चाकू हल्ला केला. तर हर्षवर्धन कुंदे याच्या हातावर चाकू हल्ला करण्यात आला. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत.जखमींना जामखेड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24