राहुरीत दोघांचा गळफास, तर एकाचा अपघाती मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राहुरी शहर –  राहुरी तालुक्यात सोमवारी तिघांचा मृत्यू झाला. घोरपडवाडी येथे हाॅटेल आयाममागे सुदाम चंद्रभान बर्डे (वय १९) या तरुणाचा निलगिरीच्या झाडाला दोर बांधून गळफास लावून घेतलेला मृतदेह आढळला. 

राहुरी येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुसऱ्या घटनेत सोनगाव येथील अनापवाडी येथील सचिन यशवंत अनाप (वय २६) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

 राहुरी येथे शवविच्छेदन करून सचिनचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तिसरी अपघाताची घटना दुपारी साडेचारच्या सुमारास नगर- मनमाड मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर घडली. किरण गिरीधर काळे (वय ४३) हे ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून ठार झाले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24