घरी बसून मतदानाची सोय हवी – नाना पाटेकर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

विविध मुद्द्यांवर आपले परखड मत व्यक्त करणारे अभिनेते नाना पाटेकर यांनी निवडणूक व राजकारणी मंडळी यांच्यावर देखील आपले रोखठोक मत व्यक्त केले. दिवसेंदिवस मतदानाचा घसरणारा टक्का ही चांगली बाब नाही. 

सरकारने मतदान जनजागृतीसाठी सर्व उपक्रम राबवले आहेत. मात्र घरी बसूनदेखील मतदान करण्याची सोय उपलब्ध व्हावी, असे ते म्हणाले. दादर येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी आपले मत व्यक्त केले.

या वेळी त्यांनी राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या पद्धतीवर स्पष्ट भूमिका मांडली. मी एखादी चांगली गोष्ट केली असेल, चांगली कामे केली असतील तर मतदार हे मतदान करतीलच. त्यासाठी प्रचार कशाला हवा. एकमेकांना व्यासपीठावरून शिवीगाळ करणं, उणीदुणी काढणं, प्रचाराची पातळी घसरणे या सगळ्या गोष्टी पटत नाहीत.

प्रचाराची पद्धत बंद झाली तर, निवडणुकीसाठी होणारा खर्चही कमी होईल. तुम्ही फक्त उमेदवारी घोषित करा, असं त्यांनी सांगितलं. प्रचाराची पद्धत बंद झाल्यानं निवडणुकीसाठीचा खर्च बंद होईल. 

अहमदनगर लाईव्ह 24