राज्यात पुन्हा फडणवीस सरकार!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई : राज्यात पुन्हा भारतीय जनता पार्टीचेच पूर्ण बहुमताचे सरकार येईल आणि त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील, अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी एका जाहीर सभेत दिली.

या विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा मुख्य मुद्दा काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचाच असेल, असे सांगत प्रचाराचे रणशिंग फुंकले.

भाजपाने घटनेचे कलम ३७० आणि ३५ ए रद्द करण्याविषयी देशव्यापी जनसंपर्क अभियान आयोजित केले आहे. त्याचा भाग म्हणून अमित शहा यांचे नेस्को सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश प्रभारी सरोज पांडे, प्रदेश निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, उच्चशिक्षण मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक आणि मुंबई भाजपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा आदी यावेळी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24