राज्यातील ‘या’ भागात 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पुणे-
अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र (ट्रफ) यांची तीव्रता टिकून असल्याने राज्यात आगामी तीन ते चार दिवस पाऊस सक्रिय राहणार असल्याचे संकेत आयएमडीने दिले आहेत.

 त्यामुळे पश्चिम-मध्य महाराष्ट्रासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, सोमवारी मध्यरात्रीनंतर पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर परिसरात आणि कोकणात सकाळी आठ वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. मंगळवारी दुपारी चारपर्यंत उघडीप होती. मात्र, साडेचारच्या सुमारास अंधारून आले आणि पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. 

हा पाऊस रात्री उशिरापर्यंत रिमझिम स्वरूपात पडत होता. दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचे नवे क्षेत्र निर्माण होत असून, येत्या २४ तासांत त्याविषयी अधिक माहिती आणि इमेजेस मिळतील. या क्षेत्राची तीव्रता आणि व्याप्ती यांचा अंदाज नेमकेपणाने २४ तासांनंतरच येऊ शकेल. या क्षेत्राची दिशा राज्याकडे असल्यास पूर्ण दिवाळीही ओलीचिंब होण्याचा संभव आहे.

अहमदनगर लाईव्ह 24