मतमोजणी ठिकाणी नेटवर्क जामर बसवावेत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि.२१) मतदान प्रक्रिया पार पडली आहे.दि.२४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. या दरम्यान मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ईव्हीएम मशिन स्ट्राँगरुम व मतमोजणी ठिकाणी नेटवर्क जामर बसविण्यात यावेत.

अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आ.अरुण जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते व बाळासाहेब जगताप यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मतदान प्रक्रियेनंतर ईव्हीएम मशिन ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत.त्या स्ट्राँग रुम व मतमोजणी ज्या ठिकाणी करण्यात येणार आहे.

त्या परिसरात नेटवर्क जामर बसविण्यात यावे. तसेच मतमोजणी करताना ती नि:पक्षपाती करण्यात यावी. स्ट्राँग रुमच्या परिसरात संशयित व्यक्ती आढळल्यास अथवा परिसरात कोणतीही संशयित वाहने आढळल्यास त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात यावे. याबाबत योग्य ती खबरदारी घेवून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24