अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर पंचायत समितीच्या सभापती पदी,गणेश शेळके यांची बिनविरोध तर उपसभापती पदी आ.निलेश लंके गटाच्या सौ.सुनंदा सुरेश धुरपते यांची ६ विरुद्ध ४ मताने निवड जाहीर करण्यात आली आहे.
पारनेर पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी सुधाकर भोसले व साह्य अधिकारी किशोर माने यांच्याकडे सभापती व उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.
यावेळी सभापती पदासाठी शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य गणेश शेळके व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्या सौ.सुनंदा सुरेश धुरपते यांनी अर्ज दाखल केले होते.
तर उपसभापती पदासाठी काँग्रेसचे सदस्य दिनेश बाबर व राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनंदा धुरपते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस सदस्या रोहिणी संतोष काटे यांनी आपल्या सदस्याचा राजीनामा दिला होता त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस संख्याबळ कमी झाले होते.
कर्जुले हर्या गणाच्या शिवसेनेच्या सदस्या, सरूबाई वाघ या राष्ट्रवादीच्या गोटात सहभागी झाल्या होत्या.त्यामुळे या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी चुरस निर्माण होवुन घोडेबाजार तेजीत झाला होता.
या निवडणुकीत १०सदस्य हजर होते. पारनेर पंचायत समिती मध्ये शिवसेना ४ राष्ट्रवादी काँग्रेस ४ व काॅग्रेस २ असे पंचायत समिती सदस्य संख्या बळ असल्यामुळे पंचायत समिती सदस्यांची पळवा पळवी सुरू झाली होती.
तर दुसरीकडे सभापती पदासाठी शिवसेने कडून गणेश शेळके राष्ट्रवादी कडुन सुनंदा धुरपते तर काँग्रेस कडुन मा. सभापती राहुल झावरे हेही इच्छुक होते.
परंतु काँग्रेसचे सदस्य दिनेश बाबर यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने माजी सभापती राहुल झावरे यांची साथ सोडली होती.बाबर हे शिवसेनेच्या गोटात सहभागी होवुन उपसभापती पदासाठी शिवसेना सदस्यांच्या जोरावर अर्ज दाखल केला होता.