पारनेरला शिवसेनेचे विजय औटी यांच्यासमोर त्यांच्याच पक्षात एकेकाळी असलेले व त्यांचे शिष्य मानले जात असलेले निलेश लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून औटींसमोर मोठे आव्हान उभे केले होते.
लंके यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांपैकी काहींनी स्वीकारले व काहींनी विरोधात भूमिका घेतली. पण पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांची साथ मिळाल्याने त्यांना आणखी ताकद मिळाली.
विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळाले असले तरी औटी यांना त्याचा फायदा झाला नाही. त्यांच्या मागील कार्यकाळातील नाराजी वाढत जाऊन त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.