पुण्यामधील NIV ने तयार केली ‘कोविड१९ अँटिबॉडी’चा शोध घेणारी पहिली स्वदेशी किट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पुणे कोरोनाविरुद्धच्या लढाईत लढ्यामध्ये भारताने अजून एक यश मिळवले आहे. पुण्याने आणखी एक मोठं काम करत पुण्यातल्या National Institute of Virologyने पहिली स्वदेशी Antibody टेस्ट किट विकसित केली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी याबाबत माहिती दिली.”पुण्यातील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने कोविड१९ अँटिबॉडीचा शोध घेणारी पहिली स्वदेशी टेस्टिंग किट तयार केली आहे.

जास्त लोकसंख्या असलेल्या परिसरात करोना व्हायरस संसर्गावर पाळत ठेवण्यात आणि कोरोना संक्रमितांची ओळख पटवण्यास ही किट महत्वपूर्ण भूमिका निभावेल”, असे ते म्हणाले.

अडीच तासांमध्ये ९० चाचण्या घेण्याची या किटची क्षमता आहे अशी माहितीही त्यांनी दिली. याशिवाय, कोविड-१९ (कोरोना) विषाणूवर प्रतिबंधक लस शोधून काढण्यासाठी

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (बीबीआयएल) हे संयुक्त संशोधन प्रकल्प राबविणार आहेत.

आयसीएमआरची पुणे येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) ही संस्था असून तिच्या सहकार्याने ही लस विकसित केली जाणार आहे.

स्वदेशी बनावटीची ही लस बनविण्यात भारताला यश आल्यास ते देशाच्या संशोधन क्षेत्रासाठी ललामभूत ठरणारे कार्य असेल.

अहमदनगर लाईव्ह 24