अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-कोरोना सारख्या साथरोगामध्ये अनेकांचे व्यवसाय बंद पडले किंवा अडचणीत आले. यात महिला बचत गट व हातावर व्यवसाय करणारे सुध्दा सामील आहेत.
त्यांना आर्थिक मदत करणाऱ्या संस्था (मायक्रो फायनान्स ) सारख्याकडून सक्तीची वसूली किंवा दमदाटी सारख्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत.
याची शहानिशा करण्यासाठी अग्रणी बँकेकडून जिल्ह्यातील सर्व 15 मायक्रो फायनान्स कंपन्याच्या पदाधिकारी व कर्मचारी यांची आज बैठक घेण्यात आली.
यावेळी त्यांना महिला बचत गट आणि हातावर व्यवसाय असणारे यांच्याकडून सक्तीने वसुली करण्यात येऊ नये, असे अग्रणी बँक अधिकारी संदीप वालावलकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. यासाठी अग्रणी बँक अहमदनगर कडून 1800-102-1080 हा टोल फ्री नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ज्या कोणी कर्जदारावर अशा प्रकारचा अन्याय किंवा दमदाटी होत असेल त्यांनी या क्रमांकावर त्यांची तक्रार नोंदवावी. कोणत्याही अफवा अथवा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved