अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- कमी कष्टात जास्त पैसे कमावण्याची सवय असलेल्या गुन्हेगारी क्षेत्रातील तरुणांना घरातच राहाण्याची वेळ आली आहे. दोन महिन्यात शिर्डी शहरात एकही पाकिटमारीसारखी घटना घडली नाही.
हे पहिल्यांदाच घडत आहे, असा सुर जागरूक नागरिकांनी व्यक्त केला आहे. कमी शिक्षण व समाजाच्या प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या, वाईट संगतीने गुन्हेगारी क्षेत्रात पाय टाकलेल्या पाकिटमारीसारख्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांबरोबरच मुली, पुरुष व महिलादेखील आहेत.
लगतच्या जिल्ह्यातुन येऊन सहजपणे हातसफाई करुन पैसे कमावणारी मंडळी मोठ्या प्रमाणावर सक्रीय आहे. शरीराला कुठलीही इजा न करता हातसफाई करुन पळुन जाणे ही गुन्ह्याची मोडस ऑपरेडी असली तरी सहजपणे जामिनावर मुक्तता होत असल्याने काहींचे मोठे धाडस वाढले होते.
साई मंदिरांचे चारही गेट, एसटी बसस्थानक, भोजनालय परीसरात नेहमीच या लोकांचा वावर होता. अशा पद्धतीने गुन्हा करत असलेल्या काही टोळ्या कार्यरत होत्या. यातून मोठमोठे हॉटेलमधील मोठे वैवाहिक कार्यक्रमदेखील सुटले नव्हते. या चोरीत अल्पवयीन मुलांचादेखील वापर झाला होता.
या टोळ्या थेट परराज्यातील होत्या. हेदेखील तपासात पुढे आले होते. कमावलेल्या पैशांचा उपयोग मौजमजा करण्यासाठी व व्यसनासाठी केला जात होता. गुन्हा करताच कमी वेळात शिर्डी सोडून निघून जाणे, ही गुन्ह्याची पध्दत होती. यामुळे यांना पकडण्यासाठी पोलिसांनादेखील मोठी कसरत करावी लागत होती.
गुन्ह्यात मुद्देमाल जप्त करण्यासाठीदेखील पोलीसांना कसरत करावी लागत असे. मात्र कोरोणा महामारीत साईबाबा मंदिर बंद आहे.
तसेच असलेल्या देशातील व राज्यातील तसेच जिल्ह्यातील सिमांवर होत असलेली कठोर चौकशी यामुळे या व्यवसायात काम करत असलेल्या गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांनी घरातच बंदीस्त करून घेतले आहे.
कोरोणासारख्या जिवघेण्या आजाराचा धसका म्हणा किंवा लॉकडाउनचा परिणाम म्हणून की काय दोन महिन्यांत पाकिटमारीसारखी घटना घडलेली नाही, असे शिर्डी पोलिसांनी सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com