अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-पिंपरी चिंचवड मधील एका मोटार चालकाने ट्रॅफिक पोलिस सावंत यांना फरफटत नेलेले पण त्यांनी प्रसंगवधान दाखवून आपला जीव वाचवला. याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.
अशी अजून एक घटना सोलापूरातही घडली, पण आमच्या हवालदार साहेबांनी हिमंत दाखवली याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मला आज फोन केला. त्यावेळी अर्णव गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत राज्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर गोस्वामी यांच्या कुटुंबियांना भेटू देण्याची, तसंच त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्यावी अशी सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली आहे. राज्यपालांनी यापूर्वीही देशमुख यांच्याकडे गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरुन नाराजी व्यक्त केली होती.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. “कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करेल. ही केस बंद झाली होती. अन्वय नाईक यांच्या पत्नीने कोर्टात अर्ज केला होता.
त्यानंतर ही केस रिओपन करण्याची परवानगी कोर्टाने त्यांना दिली.” न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील नगरपालिका शाळेतील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. याचदरम्यान, न्यायालयीन कोठडीत असताना शुक्रवारी अर्णब गोस्वामी यांनी मोबाईल वापरल्याचे समोर आले आहे.
यावेळी अर्णब गोस्वामी हे सोशल मीडियावर लाईव्ह असल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात, अर्णब गोस्वामी यांच्याकडे मोबाईल फोन कसा पोहोचला? याची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved