अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- राज्यातील कुठलाही सरपंच हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त हुशार आहे. महाविकासआघाडीचे सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कृपेमुळे बसलं आहे.
नाहीतरं असा मुख्यमंत्री कोणी केला असता. उद्धव ठाकरेंचं कोणीही ऐकत नाही. अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. ते सिंधुदुर्ग येथे बोलत होते.
महाविकासआघाडीचे सरकार पवारांच्या कृपेमुळे बसल आहे. नाहीतर असा मुख्यमंत्री कोणी केला असता? या राज्यातील कोणताही सरपंच या मुख्यमंत्र्यांपेक्षा कितीतरी हुशार आणि कायदे माहिती असलेला आहे, असे नारायण राणे यावेळी म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंचे कोणीही ऐकत नाही. कारवाई केली तर हातात आहेत तीही लोक पळतील. असाही ते म्हणाले.
मंत्रालयात ते येत नाहीत : ते घरातून बोलतात. लोकांसमोर येऊन बोलत नाही. मंत्रालयात ते येत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांना सांगतात. इतरांना ५० माणसं जमवू द्यायची नाही आणि संजय राठोडवर काय कारवाई केली नाही.
टीव्हीवरुन बोलत असताना लोकांना प्रश्न विचारतात तुम्ही काही उत्तर देत नाही. लोकं समोर नव्हते. त्यांचं कोणीही ऐकत नाही. म्हणूनच महाराष्ट्राची ही अवस्था आहे, असेही नारायण राणे म्हणाले.