अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : भविष्यात स्वतः किंवा आपल्या कुटुंबातील कोणताही सदस्य कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे जि. प. कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबासाहेब तांबे यांनी बुधवारी जाहीर केेले.
मात्र, आपण राजकाणातून निवृत्ती घेतलेली नाही, राजकारणात सक्रिय राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. तालुका व जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल माजी आमदार वसंतराव झावरे व विजय औटी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून तांबे यांनी म्हटले आहे,
आजची राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. राजकारणाची व्याख्या बदलत चालली आहे. पूर्वी शब्द, विकास, काम या गोष्टींना किंमत होती. आज ती उरलेली नाही.
तरुण पिढीचं राजकारण आता वेगळं वळण घेत आहे. नवनवीन संकल्पना राजकारणात रूढ होत आहेत. त्यामुळेच राजकारणातून निवृत्त होण्याची वेळ आली आहे. माझ्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांना वेदना होतीलही,
परंतु आपल्यातीलच नवीन लोकांना पुढे येता येईल, नेतृत्व करता येईल. ज्यांच्यात क्षमता आहे, त्यांनी पुढं यावं, काम करावं, आपलं नेतृत्व सिद्ध करावे. सर्व सहकाऱ्यांसाठी मी तन-मन-धनाने सोबत राहणार आहे, असे तांबे म्हणाले.
राजकारणातून निवृत्ती घेणार याचा गोड अर्थ कोणी असा काढू नये की, मी रणांगण सोडले. माझे मावळे आपल्यासाठी सक्षम पर्याय आहेत. मी त्यांच्या पाठीशी नव्हे, तर त्यांच्यासोबत उभा आहे,
असे सांगत तांबे यांनी राजकारणातील आपली भूमिका स्पष्ट केली. पत्नी सुमन या गोरेगावच्या सरपंचपदाचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews