अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्ह उपाध्यक्षपदी व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या शहराध्यक्षपदी अनिल निकम यांची निवड झाल्याबद्दल शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे व चंद्रकांत फुलारी यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी सागर बोडखे उपस्थित होते. आनंद लहामगे म्हणाले की, अनिल निकम यांनी निस्वार्थ भावनेने समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. नुकतेच त्यांना महत्त्वाची जबाबदारी सोपवून विविध पदावर नियुक्ती करण्यात आली.
संपुर्ण राज्यात ओबीसीच्या एका छताखाली सर्व जाती एकवटल्या आहेत. सर्व ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीचा हा संघर्ष असून, निकम या दृष्टीने संघटन मजबूत करण्याचे कार्य करतील अशी आशा व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना अनिल निकम म्हणाले की, नाभिक महामंडळाचे कल्याणराव दळे व बहुजन विकास मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर नियुक्ती झाली असून,
आपण केलेल्या कामाची ही पावती असून, समाजासाठी निस्वार्थ भावनेने सर्वपरीने योगदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील सर्व समाजांना जोडण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.