महाराष्ट्र

आता महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यास होऊ शकते ‘ही’ कारवाई

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :-  अनेकदा महावितरणच्या कर्मचाऱ्यांना काही थकबाकीदार ग्राहकांकडून होणाऱ्या शिवीगाळ, धक्काबुक्की, मारहाण तसेच कार्यालयांच्या तोडफोड प्रकरणी महावितरणने गंभीर दखल घेतली असून

संबंधित व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाईसाठी उच्चस्तरावरून तसेच विधी विभागाकडून विशेष पाठपुरावा करण्यात येत आहे.

त्यामुळे आता महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यास महाग पडू शकते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील वीजग्राहकांच्या सेवेत अहोरात्र कर्तव्य बजावणारे महावितरणचे अभियंते,

कर्मचारी सध्या गंभीर आर्थिक संकटामुळे थकबाकीदारांकडून वीजबिलांची वसूली व नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करीत आहेत.

मात्र वर्षानुवर्ष वीजबिल थकविणाऱ्या ग्राहकांकडून महावितरणच्या कर्मचार्यांमना शिवीगाळ, मारहाण तसेच कार्यालयांमध्ये जाऊन तोडफोड करण्याचे प्रकार सुरु आहेत.

शासकिय कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे किंवा कार्यालयांची तोडफोड करणे आदी प्रकरणांमध्ये भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांन्वये शिक्षेची तरतूद आहे.

त्यामुळे अभियंता व कर्मचाऱ्यांना आपले शासकीय कर्तव्य बजावता यावे यासाठी शिवीगाळ व मारहाणीच्या प्रकरणांमधील व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करण्यासाठी महावितरणच्या उच्चस्तरावरून पाठपुरावा सुरु करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office