अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- शासनात विलानीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. एकीकडे हे सगळे सुरु असताना दुसरीकडे आता शिक्षकांनी संपाचे हत्यार उगारले आहे.
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संप पुकारणार आहे. कर्मचाऱ्यांनी सोमवारी (२२ नोव्हेंबर) लाक्षणिक संप पुकारला आहे.
राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे महत्वाचे प्रश्न उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या स्तरावर गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत, याबाबत अनेक वेळा निवेदन, भेटी आणि बैठका होऊन सुद्धा शासनाच्या उदासीनतेमुळे हे प्रश्न सुटलेले नाहीत.
नेमक्या काय आहेत मागण्या? जाणून घेऊ…
आश्वासित प्रगती योजनेचा रद्द झालेला शासन निर्णय पुनर्जीवित करण्यात यावा.
कृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करावा.
सातव्या वेतन आयोगाची ५८ महिन्यांची थकबाकी अदा करावी.
पाच दिवसांचा आठवडा सुरु करण्यात यावा
इत्यादी मागण्यांची पूर्तता न झाल्यास महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या ठरावानुसार सोमवारी (२२ नोव्हेंबर) लाक्षणिक संप करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार आहे.