आता या राजकीय पक्षाचे 5 रुपयात जेवण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- शिवसेने पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने कल्याणरोडवरील शिवाजीनगर येथे गरजूंना ५ रुपयात भोजन देण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

शिवाजीनगर परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात हातावर पोट भरणाऱ्यांची संख्या आहे. कोरोनाकाळात अनेकांचा व्यवसाय गेल्यामुळे अनेक कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे.

त्यांना मदतीचा हात म्हणून सुमारे ८0 गरजूंना दररोज ५ रुपयात भोजन देण्याची सुविधा रविंद्र हेकर यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम सुरु केला आहे.

समाजामध्ये आपले काही तरी देणे लागते, या हेतूने प्रत्येकाने आपली सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सुमित वर्मा यांनी यावेळी केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24